जळगाव राजमुद्रा | शहरातील एक ” मोठा गट ” जळगाव पोलिसांच्या रडारवर असल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. नुकतेच नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्याचा चार्ज घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘ हिटलिस्ट ‘ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई हाती घेण्यात आली असून जळगाव शहरातील ” मोठा गटाचे ” संपूर्ण रेकॉर्ड तपासले जात आहे.
यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याशी राजमुद्राच्या माध्यमातून चर्चा केली असता या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यामध्ये ” मोठ्या गटातील ” काही गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. खून तसेच अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना हद्दपारीची नोटीस यापूर्वी पोलिसांकडून बजावण्यात आली होती.
मात्र यामध्ये काही गुन्हेगारांनी नोटीस बजावल्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. यामुळे हद्दपारीची कार्यवाही गुन्हेगार अपिलात गेल्यानेमुळे थांबली होती. मात्र आणखी काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून रेकॉर्ड तपासणी सुरू आहे. लवकरच याबाबत हद्दपारचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे लवकरच कारवाई सत्र पोलिसांकडून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या प्रकरणात अधिक माहिती घेतली असता कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले गेले आहे. जळगाव शहरात कायदा सुव्यवस्था नांदावी तसेच गटा – तटाच्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहे.