मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टाने आणखी पाच दिवस वाढ केली आहे. त्यामुळे आता या दोघांना ६ जुलैपर्यंत ईडी कोठडी असणार आहे. या कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती.
काळा पैसा आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.