भडगाव (BBN-24)- चाळीसगाव नंतर आता भडगाव शहराचीही ओळख बदलली असून आ.किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे .
भडगाव येथे परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून नुकताच त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन ही चाळीसगावची नवी ओळख होणार असून आपला वाहन पासिंग क्रमांक MH54 असा असेल.जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहन पासिंग व RTO संदर्भातील कामांसाठी १०० किमी दूर जळगाव येथे ये जा करावी लागत होती. त्यात पूर्ण दिवस प्रवासात जात असल्याने वेळ व श्रम वाया जात होते. दुर्दैवाने या प्रवासात अनेकांचे अपघात देखील झाले होते.
भडगाव वासीयांच्या भावनांची व माझ्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने विशेष बाब म्हणून भडगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, श्री. अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री श्री. गिरीषभाऊ महाजन व परिवहन विभागाचे सर्व सन्मा. अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार भडगावकरांच्या वतीने मा. आ.किशोर आप्पा पाटील यांनी मानले आहे.