परळी, बीड (राजमुद्रा)/- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. अशात बीडच्या परळीतून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची सर्वत्र चर्चा आहे. अशात आता पंकजा मुंडे यांच्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघाऐवजी वेगळा पर्याय भाजपने समोर दिल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर पंकजा यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, अशीही माहिती आहे.
बीडमधील एका जाहीर सभेत बोलताना पंकजा यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर भाष्य केलं होते. काहीही करेन. पण माझ्या बहीणीला खाली बसवून तिच्या जागी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. त्यामुळे आता हा नवा पर्याय पंकजा स्विकारणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.