रावेर (राजमुद्रा)/- रावेर पोलिसांनी एका मोटरसायकल चोराला अटक करून त्याच्या कडून पाच विविध कंपन्यांच्या मोटर सायकली ताब्यात घेण्यात आले आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांचा मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आला आहे.संबधीत चोरट्या कडून पाचही मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत वृत्त असे की वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर रुजु झाल्या पासुन अवैध गुरांची वाहतुक करणा-यांवर कारवाईची संक्रात सुरू असतांना मोटरसायकल चोरीचा गुन्हा रावेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजय वाघोरे वय 27 रा.भोर रेल्वे स्टेशन रावेर हा एक फॅशन प्रो कंपनीची एम एच 19 बी आर 5269 हि मोटर सायकल चोरून आणलेली आहे.त्याची चौकशी करून पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या कडून सात हजार रुपये किमतीची एम एच 19 बी आर 5269 मोटर सायकल दूसरी ३५ हजार रुपये किमतीची एम एच 28 ए एक्स 2505 मोटर सायकल तीसरी २२ हजार रुपये किमतीची विना नंबरची मोटरसायकल चौथी ३६ हजार रुपये किमतीची 12 एमक्यु 5466 मोटर सायकल पाचवी २८ हजार रुपये किमतीची विना नंबर मोटर सायकल अश्या एकूण पाच मोटरसायकली रावेर पोलिस प्रशासनाने जप्त केल्यामुळे नागरीकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
हि कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंग वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ईश्वर चव्हाण पोना सुरेश मेढे,पोकॉ समाधान ठाकुर,सचिन घुगे,प्रमोद पाटील,विशाल, पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव सुकेश तडवी, विकार शेख यांच्या पथकाने केली आहे.