जळगांव (राजमुद्रा)/- सद्ध्या भारतात लोकसभेच्या निवडणुकींचे वारे वाहू लागल्या मुळे,गल्ली बोळात, चौकाचौकात विविध चर्चाना उत आला आहे.त्यात भारतात ७ नंबरचे खासदार असा नावलौकीक मिळविलेले उन्मेषदादा पाटील यांच्या नावाच्या अवती भोवती ही चर्चा रेगाळतांना दिसुन येत आहे.शिवाय याच नावाविषयी काही वेगळ्या प्रकारच्या अनेक चर्चा होत असतांना जिल्ह्यातील खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जळगांव मधील एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत उन्मेष पाटील सावध पवित्रा घेतला असून एकीकडे विरोधी पक्षांना उमेदवार मिळत नसतांनाही,भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढविण्यासाठी इच्छूकांची गर्दी वाढली आहे, हेच आमचे यश असुन भारताचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा आणि आम्ही केलेल्या चांगल्या कामांची पावतीच आहे.
तेव्हा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय योग्य मानत उमेदवारी कुणालाही मिळाली तरीही पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणुन दिलेली जबाबदारी मी पार पाडणार असल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले आहे