जळगाव (राजमुद्रा) – दि. 28/02/2024 रोजी जळगांव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात भूसावळ रोडवरील बस स्टँडजवळ रोडवर सार्वजनिक जागी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद उर्फ अनन वय 24 रा गेंदालाल मिल जळगांव. हा गावठि कट्टा जवळ बाळगूण फिरत असल्याची माहिती मा पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड सो यांना मिळाली होती त्याप्रमाणे सदर ठिकाणी जावून अर्शद यास ताब्यात घेतले होते. त्याचेकडून 35000/रू किं एक गावठ मूगीर बनावटिचा एक गावठि कट्टा व दोन नग जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले होते.व अवैध गावठि कट्टा बाळगतांना मिळूण आल्याने त्याचेविरूद्ध पो ना /सूधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून गून्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यास गुन्ह्याकामी अटक करण्यात आलेली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती व्हि एम देशमूख यांनी आरोपी यास 05 दिवस पोलीस कस्टडि रिमांड दिली आहे. सरकार तर्फे ॲडव्होकेट श्रीमती स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.
सदरची कारवाइ हि मा पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डि सो. मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत सो.यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे ,दिपक जगदाळे सफौ/ अतूल वंजारी, पो हे का/किरण पाटिल, पो ना / सूधीर साळवे, सचिन पाटिल,किशोर पाटिल ललित नारखेडे राहूल रगडे, नितीन ठाकूर अश्यांनी केली आहे. सदर अर्शद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.