८ मार्च रोजी जागतीक महिला दिनानिमित्त जळगाव पोलीस दलाकडुन दि. ०३/०३/२०२४ ते दि. ०८/०३/२०२४ दरम्यान विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे.त्यात दि.३ ते ७ मार्च रोज सकाळी ०८ ते ०९ या वेळेत महिलांकरीता योग शिबीराचे आयोजन. (विनामुल्य ),५ मार्च रोजी सकाळी ०८ ते १० महिलांकरीता कराटे व सेल्फ डिफेंस शिबीर. (विनामुल्य),६ मार्च रोजी सकाळी ०९ ते ०२ महिलांकरीता वैदयकीय शिबीरचे आयोजन. (विनामुल्य), ७ मार्च सकाळी ०६:०० वा.महिलांकरीता ३ किमी, ५ किमी, धावणे चालणे मॅरेथॉन स्पर्धा. वयोगट १५ ते २५ वर्ष व २५ वर्षाच्या वरील (विनामुल्य ) ८ मार्च रोजी सकाळी ०९:०० वा सकाळी महिलांकरीता नऊवारी व विविध वेशभुषा वरती हेल्मेट रॅली (विनामुल्य )असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
जागतीक महिला दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविणे बाबत मा. पोलीस अधिक्षक कार्यालय, जळगाव यांचे मार्फत आवाहन केलेले आहे. आयोजीत स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी व अधिक माहीती साठी १) महिला पो. अंमलदार अश्विनी निकम – मो. क्र. ९५९५०९१४२३, २) महिला पो. अंमलदार जागृती काळे – मो.क्र.८६०५०३८६४७ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावाअसे अहं जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे .