जळगाव (राजमुद्रा)- जळगाव शहरासह जिल्हाभरात प्रसिद्ध असलेले व कायम चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले बांधकाम व हॉटेल व्यावसायिक श्री नितीन खूपचंद साहित्य व त्यांच्या पत्नी सौ.दिया खुबचंद साहीत्या यांचे विरुद्ध ओमकार अॅसेटस रिकन्शटक्शन प्रा.लि. मुंबई (पुर्वीची खामगाव अर्बन को. ऑप बँक लि.खामगाव) तर्फे श्री. अजित गिरासे यांनी दखल केलेल्या तक्रारी नुसार म. जिल्हादंडाधिकारी, जळगांव यांचेकडील पत्र क्रं/दंड /४/सिक्यु/एसआर/२९७७९/दि.२०/९/२०२३. तसेच सिक्युरिटायझेशन ॲन्डरिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांसियल असेटस अॅन्ड इन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटाज इन्टरेस्ट अॅक्ट २००२ च्या कलम १४ अंतर्गत न्याय निर्णय , आदेशानुसार हॉटेल प्राईड चे मालक श्री..व सौ. साहित्या यांच्या मालकीची मोजे जळागव शहर येथिल १) सिटिएस नं. २१२२७/१८+१९+ २०/३ब वरील दक्षिणेकडिल बांधिव इमारत,पैकि ग्राउंड फलोअर वरील क्षेत्र१०१.९१ चौ.मि.+पहिल्या मजल्यावरील क्षेत्र ३०२.९५ चौ.मि. दुस-या मजल्यावरील क्षेत्र२८५.९५ तसेच २) मोजे मेहेरुण येथिल सिटिएस क्रं. ५०५१ अ वरील स्वामी टॉवर बिल्डींग मधील तळमजल्यावरील दुकान नं.८चे क्षेत्र १७.२२ चौ.मि.या सर्व स्थावर मिळकत व तदंगभुत वस्तुसह सर्व मालमत्ता या सर्व वरील नमुद असलेल्या यामिळकतीचे यांना वरील कायदयाच्या कलम १३ (२) अन्वये बँकेने ६० दिवसांचे मुदतीत नोटिस दिनांक १७/७/२०२० रोजी बजवुन प्राथमिक स्वरुपाची कार्यवाही केली आहे.
कायम कुठल्या ना कुठल्या कायदेशीर अडचणीत सापडून चर्चेत असणारे जळगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नितीन खूबचंद साहित्या पुन्हा एकदा कायद्याच्या कथा सापडले असून याबाबत सविस्तर माहिती अशी की नितीन खूबचंद साहित्या यांनी त्यांची मिळकत जुलै २०११मध्ये तत्कालीन बुलढाणा को-ऑपरेटिव बँक यांचेकडे तारण ठेवून काही कर्ज घेतले होते. ते कर्ज वेळेवर न भरल्याने बँकेने वारंवार कळवूनही बँकेची कर्ज वसुली न झाल्याने जळगाव मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक नितीन खूबचंद साहित्या सह त्यांच्या कुटुंबावरती व मालमत्तेवरती जप्तीची कारवाईची टाच आले आहे
मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जळगाव यांनी साहित्या दाम्पत्याला जप्तीची नोटीस बजावली असून सदर जप्तीच्या कारवाई करिता दि.२२/०३/२०२४ रोजी ,सकाळी ११.०० वा. तहसीलदार ,मंडळ अधिकारी जळगाव ,तसेच कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस खात्याला व वादी प्रतिवादी यांनी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना या नोटिशीत दिल्या आहेत