चाळीसगाव (राजमुद्रा)- राज्यात सध्या दोनच लोकं म्हणताय की, आमच्या मनातील खासदार निवडून द्या, एक अजितदादा पवार आणि दुसरे मंगेशदादा चव्हाण. आजच्या कार्यक्रमाला खासदार उपस्थित नाहीत. कारण खासदारला आताच समजतंय आता आपलं काही खरं नाही, अशा शब्दात जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार स्मिताताई वाघ, रोहित निकम, असे दिग्गज उपस्थित होते. संजय पवार विविध विकास कामांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. संजय पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
बर्याच वृत्तवाहिन्याही कालपासून जळगाव लोकसभेसाठी भाजपचा संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांचे नाव दाखवत असल्याने चाळीसगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अशीच चर्चा चालू आहे .