चाळीसगाव (राजमुद्रा )दि. १२/१२/२०२३ रोजी तालुक्यातील पोहरे येथील शेतकरी मनोज शंकर सोनावणे यांच्या गोठ्यातून ०९ बकर्या चोरीला गेल्याची घटना घडली होती .सादर घटनेबाबत मेहुणबारे पो.स्टे.गुन्हा रजि.नं.३२४/२०२३ कलम ३७९ नुसार गुन्हाही नोंदविण्यात आला होता
.सदर गुन्ह्यातील आरोपीं बाबत सपोनि संदीप परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावर मा.अप्पर पोलिस अधीक्षक नेरकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अभयसिंग देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व सपोनि संदीप परदेशी यांचे आदेशान्वये पोलीस हवालदार योगेश,मांडोळे,प्रताप मथुरे, गोरख चकोर,सुदर्शन घुले,राकेश काळे,संजय लाटे,दिपक महाजन यांना रवाना केले गोपनीय माहिती वरून संशित आरोपी1) रोहन उर्फ माऊली न्यानेश्र्वर पवार वय 23,2) राहुल रामदास मोरे वय 20 दोन्ही रा. पातोंडा ता 40 गाव ,3) सौरव संतोष मोरे वय 21 रा.सांगवी ता पाचोरा 4) दीपक प्रकाश सोनवणे वय 19 5) कपिल अशोक वाग वय 27 दोन्ही रा. पोहरे ता 40 गाव 6) लक्षुमन दशरथ माळी वय 22 रा. डामरून ता 40 गाव यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन ला आणून चौकशी केली असता वरील आरोपी यांनी बकऱ्या चोरी करून विकल्या बाबत सांगितले वरून मा.अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सपोनी संदीप परदेशी यांच्या आदेशान्वये पुढील तपास पी.एस.आय. गोपाळ पाटील हे करीत आहे.
पुढील तपासात यापूर्वी बहाळ, करमुड, बोरखेडा,वडगाव लांबे येथील चोरीस गेलेल्या बकऱ्या निष्पन्न होऊ शकतात अस्धी शक्यता वर्तवली जात आहे. मेहूनबारे पोलिसांनी मागील 8 दिवसात इलेक्ट्रिक मोटर,चोरी गेलेल्या बकऱ्या ,बाबत गुन्हे उघडकीस आणले असल्याने तालुकाभारातून मेहुणबारे पोलिसांचे कौतुक केले जात आहे .