जळगांव(राजमुद्रा)दि. 06/03/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपणीय माहीती मिळाली की, जळगाव जिल्हयातुन 02 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी सचीन उर्फ टिचकुल कैलास चौधरी रा तुकामरावाडी हा तुकारामवाडी परीसरात हातात लोखंडी तलवार घेवुन दहशत माजवित आहे बाबतची माहीती मिळाल्यावरुन रात्री 11.00 त्यास हनुमान मंदीर परीसर तुकारामवाडी येथुन ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याचेकडुन एक लोखंडी तलवार मिळुन आल्याने सदर तलवार ही जप्त करण्यात आली असुन त्याचेविरुध्द एमआयडीसी पोस्टे गुरनं. 146/2024 मुपोका 142 सह आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री डॉ. महेश्वर रेड्डी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत जळगाव भाग, मा. पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेका. रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, पोना योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, ललील नारखेडे अशांनी यांनी केली आहे.
या हद्दपार ईसमावर एमआयडीसी पोलीस स्टेशन ला 05 गुन्हे व जिल्हापेठ पोस्टे ला 02 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
तर दुसरीकडे दि.07/03/2023 रोजी मा. पोलीस निरिक्षक बबन आव्हाड सो. यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव जिल्हातून 02 वर्षाकरीता हद्यपार करण्यात आलेला आरोपी आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे, वय 23 वर्षे, रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुण जळगाव हा रामेश्वर कॉलनी, मेहरुण परिसरात हातात लोखडी सुरा कब्जात बाळगत असुन बाबतची माहिती मिळाल्यावरुन रात्री 22.30 वाजता मेहरुण तलाव जवळील बांधाजवळ त्यास ताब्यात घेतले व त्याच्याजवळ एक लोखडी सुरा मिळून आल्याने सदर सुरा जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द एमआयडीसी पोस्टे गुरंन 148/2023 मुंबई पोलीस कायदा कलम 142 सह आर्म एक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेडडी जळगाव, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत सो. जळगाव भाग जळगाव मा. पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ/1428 अतुल वंजारी, पोहेकॉ/70 रामकृष्ण पाटील, पोहेकॉ/2182 गणेश शिरसाळे, सचिन
पाटील राहुल रगडे, विशाल कोळी, ललीत नारखेडे, साई मुंढे अशांनी केली आहे.
या हद्यपार ईसमावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला 04 गुन्हे गंभीर स्वरुपाचे दाखल आहे.