चाळीसगाव (राजमुद्रा )- आज दि.११ रोजी साधारण ११.३० वा.सुमारास पल्लवी कंपनीची खाजगी बस (ट्राव्हेल) औरंगबाद्कडून शेंधवा जात असताना अचानक कन्नड घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटाच्या पायथ्याला सुरक्षा कठडे तोडत लहान दरीत उतरून गंभीर अपघात झाल्याचे कळते आहे .
मिळालेल्या माहितीनुसार या बस मध्ये एकूण ३० (मजूर) प्रवाशी प्रवास करीत होते .सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून आतापर्यंत १६ अपघातग्रातांवर ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे प्राथमिक उपचार करण्यात आले असून २ प्रवाश्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे इथे हलविण्यात आले आहे.