चाळीसगाव (राजमुद्रा)-दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये पहाटेच्या वेळी चाळीसगाव शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शहरामधून वाहणाऱ्या डोंगरी व तितुर या दोन्ही नद्यांना प्रचंड महापूर आला होता या महापुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही नदीपात्रांच्या किनाऱ्यावर वसलेल्या खेड्यापाड्यातून व शहरातून जवळपास 800 ते 1000 पाळीव जनावरे वाहून गेली होती शिवाय नदीकाठी राहणाऱ्या वाड्या वास्त्यांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते नदीकाठी असणाऱ्या शेती क्षेत्रांमध्ये उभे पिके सुद्धा वाहून गेली होती या महापुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की आजही महापूराचे चित्र डोळ्यासमोर आल्यावर अंगावर शहारे उभे राहतात
या घटनेनंतर तालुक्याचे लाडके आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील महापूर ग्रस्त नागरिकांच्या व्यथा वेळोवेळी विधानसभेत मांडून शासनाकडून जवळपास सहा कोटी 38 लाख रुपयांचा निधी मिळवून आणला आहे हे चाळीसगाव तालुका वाशींसाठी अत्यंत आनंदाची वार्ता असताना महापूर ग्रस्तांच्या लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये चांगलाच गोंधळ असल्याचे दिसून आले आहे ज्यांची खरोखर 2019 च्या महापुरामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे ज्यांची खरोखर घरे दारे गुरे शेती नदीच्या पाण्यात वाहून गेली आहेत अशा पुरग्रस्तांची नावे या लाभार्थी यादी मधुन वगळण्यात आले असून त्यांच्या घराला पोराचे पाणी शिवले देखील नाही ज्यांची दोन दोन ताली आरसीसी बिल्डींग आहेत अशा लोकांची नावे स्थानिक पुढारी तत्कालीन तलाठी व पंचनामे करणारे अधिकारी यांच्या संगणमताने लाभार्थी यादीत टाकण्यात आली असल्याचा गंभीर आहोत खेरडे येथील काही महापूर ग्रस्त शेतकरी बांधवांनी आज बी बी एन 24 शी बोलताना केला असून तशा आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब चाळीसगाव तसेच प्रांताधिकारी जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमेश दादा पाटील व चाळीसगाव विधानसभेचे लाडके आमदार मंगेश चव्हाण यांना दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हा खऱ्याखोऱ्या महापूर ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती
निवेदनात केली आहे निवेदनावर प्रशांत रघुनाथ पाटील नंदू साहेबराव पाटील दिलीप पाटील दीपक पाटील शरद पाटील दिगंबर पाटील विनोद पाटील यांच्यासह महापुर ग्रस्त शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.