नवी दिल्ली राजमुद्रा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ वीस लोकसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे, तर नागपूर मध्ये नितीन गडकरी यांना तिकीट देण्यात आले आहे.
अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले जळगाव व रावेर मतदार संघातही उमेदवारांची नावाची घोषणा झाली असून रावेर मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा रक्षा खडसेंवर विश्वास दाखवला आहे तर बहुचर्चित जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार उमेश दादा पाटील यांचे तिकीट पक्षाने कापले असून त्यांच्या ऐवजी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तिकीट स्मिताताई वाघ यांना देण्यात आले आहे, तसेच पुण्यामधून अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळ व उत्तर मुंबई मधून पियुष गोयल हे भाजपाचे उमेदवार असतील.