चाळीसगाव ( राजमुद्रा )- काल सायंकाळी चाळीसगाव शहर पोलिसांना आलेल्या संशयावरून मारुती इको क्रमांक एम एच19 इ ए 3958 ची झडती घेतांना त्यात 924000/- रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानव ही मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू माल भरुन विक्री करता अवैधपणे वाहतूक करताना मिळून आल्याने त्याचे विरोधात भा.द.वी.कलम 328,188, 272,273,सह अन्नसुरक्षा अधिनियम मानके 2006 कलम 26,2, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल रमेश पाटील,भुषण पाटील,विजय पाटील उपस्थित होते, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.