पारोळा (राजमुद्रा ) – विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी नामे विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी रा चौधरी
गल्ली पारोळा यास मा. उपविभागीय दंडाधिकारी एरंडोल भाग यांच्या आदेशान्वये ०१ वर्षाकरीता जळगाव
जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले होते.
सदर हद्दपार ईसम नामे विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी, रा चौधरी गल्ली, पारोळा हा पारोळा
शहरात लपुन छपुन फिरत असले बाबत श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे
शाखा यांना गुप्त बातमी मिळाल्याने PSI गणेश वाघमारे, पोह नंदलाल पाटील, पोह प्रमोद लांडवंजारी,
पोह किरण धनगर, पोना भगवान पाटील, पोना राहुल बैसाण चापोका मोतिलाल चौधरी सर्व नेमणुक
स्थनिक गुन्हे शाखा पथकास रवाना करुन पुढील कारवाई करणे बाबत आदेशित केले.
वर नमुद पथकाने दि.१३/०३/२०२४ रोजी पारोळा शहरात गोपनिय माहिती काढुन
संशयित ईसम नामे विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी, रा चौधरी गल्ली, पारोळा हा धरणगाव चौफुली येथे
येताच दबा धरुन बसलेल्या पथकाने शिताफीने सदर संशयित ईसमास ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर
कारवाई करुन पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन सदर संशयित ईसमास पारोळा पोलीस
स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर,
अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री सुनिल नंदवालकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर
यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.