मुंबई (राजमुद्रा ) : – देशातील विविध राज्यातील वातारणात सातत्यानं बदल होत आहेत. कुठं उन्हाचा कडाका, तर कुठं ढगाळ वातावरण असं चित्र आहे. महाराष्ट्रात देखील अशीच स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने तापमान वाढ होतेय. आता 15 मार्चपासून राज्यात आणखी उष्णता वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर तापमानात सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.