Loksabha election 2024 नवी दिल्ली (राजमुद्रा)- देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा शंखनाद झाला असून एकून ७ टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी यंदा देशात ९७ कोटीहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. यासाठी ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे
पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे.
सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी होणार आहे.
सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.
४ जूनला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की १.८२ कोटी तरुण मतदार मतदान करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील 21.5 लाख मतदार आहेत.