जळगांव (राजमुद्रा) – पिपलोद पोस्टे जिल्हा खंडवा मध्यप्रदेश येथे आरोपी नामे 1) अनोप धनसिंग कलम (कोरकु), उमर- 18,निवासी सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, 2) अंकीत सुकलाल ठाकुर, (कोरकु), उमर- 22, निवासी-अरविंद नगर, मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश यांचेकडुन एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतुन 06 चोरी वेगवेगळ्या कंपनीच्या मोटार सायकली चोरी केल्या आहे अशी बातमी मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करुन सदर आरोपीतांचा खंडवा कारागृहातुन ताबा घेवुन त्यांना गुन्हयात अटक करुन त्यांनी पोस्टे हद्दीतुन 06 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे मो सा जप्त करण्यात आल्या आहे.
भादवी कलम 379 प्रमाणे मोटार सायकल विवरण
काळया रंगाची हीरो होंडा स्प्लेंडर मो सा क्र एमएच 19 इइ 1648 ,बजाज कंपनीची पल्सर मो सा क्र. एम.पी 12 एम. वाय 9247 , भादवी कलम 379 प्रमाणे होंडा कंपनी कि ड्रीम युगा मॉडेल एम.एच 19 बी. वाय 9462,भादवी कलम 379 प्रमाणे होंडा युनीकॉर्न मो सा क्र. एमएच 19 सीक्यु 4931, भादवी कलम 379 प्रमाणे ड्रीम युगा मोटार सायकल क्र. MH 19 ED 5634 , भादवी कलम 379 प्रमाणे होन्डा कंपनीची चॉकलेटी रंगाची एम.पी. 10 एम.यु. 5784 क्रमांकाची शाईन गाडी अश्या एकुण 06 मोटार सायकली 185,000/- रुपये किंमतीच्या आरोपी यांनी काढुन दिलेल्या आहेत. सदर कारवाई ही मा.. पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत सो, मा. पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड सो यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ. अतुल वंजारी, पोहेका गणेश शिरसाळे, गफुर तडवी, पोना सुनील सोनार, विकास सातदीवे,योगेश बारी, पोका छगन तायडे यांनी केली आहे.