जळगाव(राजमुद्रा) – जळगाव जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेडडी सो. यांचे आदेशाने व
उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर श्री राजकुमार शिंदे सो., मुक्ताईनगर पोलीस
निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनअंतर्गत परिवर्तन चौक
येथे लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशांगाने नाकाबंदी लावण्यात आली होती. सदरचे
नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी पथकाचे सपोनि.संदीप धुमगहू, पो.हवा. छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत
चौधरी, पोशि.प्रविण जाधव, पोशि.अभिमण पाटील यांना एक संशयीत कार येताना दिसताच
त्यांनी सदरची कार थांबवुन कारची तपासणी केली असता कारमध्ये भवरलाल जेठमल जैन, राह.
जळगाव यांचे बॅगमध्ये २७९.७३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वस्तु अंदाजे किमत
२०,००,०००/- रुपये कोणत्याही पावती विना/परवाना विना मिळुन आले असता फिरते पथक
प्रमुख असिस्टंट इंजीनीयर अनिल नेरपगार, पंचायत समीती बोदवड यांना बोलावुन त्याचेकडे
पुढील कायदेशीर कारवाईस्तव हस्तातरीत करण्यात आलेले आहे.
–
सदरची कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री.
अशोक नखाते, अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस
अधिकारी, मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शानाखाली पोनि/ नागेश मोहीते, सपोनि संदीप धुमगहू,
पो.हवा.छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि. प्रविण जाधव, पोशि.अभिमण पाटील नेम
मुक्ताईनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे.