चोपडा(राजमुद्रा)- चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये अनधिकृत पणे पत्र्याचे शेड लावुन मोठ्या प्रमाणात पिडीत महीलांना अडकवुन त्यांच्याकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असलेबाबत
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना खबर मिळाली होती. त्यानुसार दिनांक 20/03/2024 रोजी 19:45 वा. चे सुमारास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सदर ठिकाणी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला व पंचाना नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये पाठवुन तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असल्याची खात्री करणेबाबत कळविले
होते. तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असलेबाबत खात्री झाल्याने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग चोपडा, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार अशांनी सदर ठिकाणी छापा मारुन कारवाई केली असता एकुण 11 महीला आरोपी हे स्वतःचे फायद्यासाठी त्यांचे ताब्यातील झोपड्यामध्ये एकुण 50 महीलांना अडकवुन त्यांचा देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांचेकरवी कुटूंणखाना चालवितांना मिळुन आल्या आहेत.
त्यांचेवर चोपड़ा शहर पोलीस स्टेशनला CCTNS गु.र.नं.-111 / 2024 स्त्रिया व मुलीचे अनैतीक व्यापारास प्रतिबंध अधिनियम सन 1956 चे कलम
3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी 1) शर्मिला काले तमंग वय 48 वर्ष रा. नारायणवाडी ता चोपडा ह मु वॉर्ड नं 34
रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि.जळगांव 2) उषा युवराज धोटे वय 40 वर्ष रा. वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 3) किरण हरी लांबा वय 40 वर्ष रा. होलशीमन काठमांडु नेपाळ ह मु रा वॉर्ड नं 34
रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 4) मिराबाई चिंतामण चौधरी वय 45 वर्ष रा गांधलीपुरा अंमळनेर ह मु वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 5)मंगलाबाई रमेश मराठे वय 58 वर्ष रा. नगरपालीका
पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 6) नुरजहाँ बेगम अकबर शेख वय 47 वर्ष रा आसमसोल ब्रम्हचारी विद्यालय कालीपुर गेट कोलकाता ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 7 ) आसमा बेगम अब्दुल्ला शेख
वय 35 वर्ष अनंत बिल्डीग कळंबोली रोड रायगड ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
8)सुभद्रा पुम्या नायक वय 40 वर्ष रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 9) माया बाप बख्तु लांमा वय 54 वर्ष रा. सिक्कीम ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव 10 ) संगीता जित बहादुर थापा वय 53 वर्ष रा. नारायण वाडी चोपडा हभु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव
11) सुनिता देवी फौजी मंडल वय 40 वर्ष रा. गोणगा अभय नगर कोलकाता ह मु रा वॉर्ड नं 34 रा. नगरपालीका पाटीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन एकुण 50 पिडीत महीलांची सुटका करुन
त्यांना आशादिप सुधारगृह जळगांव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सारे जिल्हा जळगांव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर सा चाळीसगांव परीमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे सो, चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे चोपडा शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत कंडारे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. एकनाथ भिसे, पोउपनि श्री. अनिल भुसारे, पोउपनि श्री. योगेश्वर हिरे, सफौ. / 2570 जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ / 3180 विलेश सोनवणे, पोहेकॉ / 1577 दिपक विसावे, पोहेकॉ / 2688 हरिषचंद्र पवार, पोहेकॉ / 1590 शेषराव तोरे, पोहेकॉ / 2086 संतोष पारधी, पोहेकॉ / 1805 ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ / 343 महेंद्र साळुंखे, पोहेकॉ / 1576 सुभाष सपकाळ, पोना / 3110 संदीप भोई, मपोहेकॉ / 2677 विद्या इंगळे,
पोहेकॉ / 1651 शुंभागी लांडगे, मपोहेकॉ / 2381 रत्नमाला शिरसाठ, पोकों/ 1629 रविद्र दिलीप पाटील, पोकों/ 945 लव सोनवणे पोकॉ / 2431 युनुस शहा, पोकों / 1757 प्रकाश मथुरे, पोकों / 1529 प्रमोद पवार, पोकों / 617 रविंद्र बोरसे, पोकॉ / 3238 मदन पावरा, पोकों / 3262 विजय बच्छाव, मपोकों/ 3205 अनिता हटकर यांनी केली आहे.