जळगांव (राजमुद्रा)– पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगांव यांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 ( सुधारणा 2004 ) अन्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडीया (सिमी ) या संघटनेवर यापुर्वी केंद्र शासनाने बंदी घातलेली आहे. त्याबाबत केन्द्रीय गृहमंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र क्रमांक 14017/23/2024-NI-MFO, Dt. 05/03/2024 अन्वयेची प्रत प्राप्त झाली आहे.
तरी सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, भारत सरकारने बेकायदेशीर कृत्ये(प्रतिबंध) अधिनियम 1967 (सुधारणा 2004 ) अन्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडीया (सिमी ) या संघटनेवर बंदी घातलेली आहे.