मुबंई (राजमुद्रा )- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा तोफ डागली. विरोधकांसह आपने या अटकेवरुन सध्या रान माजवले आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आणि भाजप यंत्रणेच्या आडून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काय म्हणाले संजय राऊत..
केजरीवाल यांना ईडी,सीबीआयने निवडून आणले नाही, संजय राऊत यांचा केंद्रीय यंत्रणांना इशारा
संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल चढवला. विरोधकांवर दडपशाहीचा प्रयोग सुरु असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशी पण केंद्र सरकारसह भाजपवर तोफ डागली. अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावना आणि घाबरून खोट्या केस मध्ये अटक केली हे सर्व जण जाणत आहेत विश्वगुरू देखील जाणतात, असा टोला त्यांनी हाणला.
कंस मामाला भीती
दिवसेन दिवस सत्तादाऱ्यांना भीती वाटत आहे. देशात सध्या जंगल राज सुरू आहे. जसे पुतीन आणि चायना मध्ये सुरू आहे तसे इथे देखील सुरू आहे. केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. दिल्लीत भाजप 5 जागांच्यावर आले नाही. केजरीवाल जेलमध्ये राहून देखील काम करू शकतात. केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणले ईडी सीबीआय यांनी नाही. कंसाला ज्याला ज्याची भीती होती त्यांनी सर्वांना तुरुंगात टाकले. देवाला देखील तुरुंगात टाकले होते. श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला.कंस मामाला भीती वाटत आहे या सर्वांची त्यामुळे तुरुंगात टाकत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला.