जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मेहरूण तलावात एका इसमाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून, लोटन पितांबर पाटील (रा. अयोध्या नगर) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम चालू आहे. आत्महत्येचे खरे कारण अद्याप उघडकीस आलेले नसून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या नगर परिसरात रहिवासी असलेले लोटन पितांबर पाटील या इसमाने मेहरूण तलावात आत्महत्या केल्याचे आज (ता. १) दुपारी उघडकीस आले. दरम्यान तलावातून मृतदेह काढल्यानंतर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी या इसमास मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम चालू असून पुढील तपास संजय भोई व असीम तडवी करत आहेत.