चाळीसगाव (राजमुद्रा )– आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात मा . पोलीस अधिक्षक श्री . महेश्वर रेडी यांचे आदेशान्वये मा . अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनपर सुचनाप्रमाणे चाळीसगाव नांदगाव रस्तावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी लावण्यात आली आहे . आज रोजी दिनांक 23/03/2024 रोजी 19.30 वा सुमारास मा.पो.नि संदीप पाटील , योगेश बेलदार , नितेश पाटील , पंढरीनाथ पवार , पोकॉ निलेश पाटील , कल्पेश पगारे , महेद्र सुर्यवंशी यांनी येणारे जाणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असतांना चाळीसगाव शहरातुन खडकी गावाच्या दिशेने मारुती व्हॅन क्रमाक MH19DV1874 ही येतांना दिसली . सदर वाहनावर मा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना संशय आल्याने वाहन चालकास सदरचे वाहन थांबवुन पोलीस स्टॉफ सह चेक केले त्यात देशी विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या खोक्यात दिसुन आल्या . सदर वाहन चालकाकडे कोणताही दारु वाहतुकीचा परवाना नसल्याने दोन पंचाना लागलीच बोलावुन सदर वाहनाचा झडती पंचनामा केला त्यात 18460 / – रुपये किंमतीची देशी विदेशी व बियर मिळुन आली आहे . सदर वाहन चालक प्रितम बाळकृष्ण देशमुख वय २६ वर्षे रा . तळेगाव ता . चाळीसगाव जि जळगाव यास वाहनासह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर कार्यवाही दरम्यान वाहनासह एकुन 5,18,460 / – रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे .