भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा । भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. संजय भन्साली यांनी १ जुलै रोजी जमीन फेटाळला. मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश देण्यात आले आल्याने. संतोष चौधरींना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.
भुसावळच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून सत्र न्यायालयात यापूर्वी दिनांक २२ व जून रोजी २४ तसेच ३० जून रोजी जामिनावर युक्तिवाद करण्यात आल्यानंतर न्यायालयाने १ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येईल असे सांगितल्याने निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. दरम्यान भुसावळात सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी संदीप चित्रवार हे दिनांक १४ जून रोजी अधिकाऱ्यांसह गेले असता माजी आ. संतोष चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौधरी यांच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायालयात माजी आ. संतोष चौधरी यांच्या वतीने वकील जगदीश कापडे , वकील मनीष शेवलानी. तर सरकार तर्फे वकील विजय खडसे यांनी काम पाहिले.