जळगाव (राजमुद्रा )- सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, एकीकडे भाजप प्रणित एनडीए आघाडी तर दुसरीकडे काँग्रेस व इतर घटक पक्ष मिळून इंडिया आघाडी असे चित्र आहे. दोघांनीही या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर, हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे, सद्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे गेल्या वेळेस या मतदारसंघातुन भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते,
भाजपने आपली राज्यातील लोकसभा उमेदरांची पहिली यादी प्रसिद्ध केली, यात जळगाव लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होता, या यादीत मात्र विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून अमळनेरच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने मतदार संघात तीव्र नाराजी आहे .त्यामुळे कादाचीत यावेळी मोदी लाट ओसरून उन्मेष लाट येण्याची प्रचंड शक्यता निर्माण झाली आहे .
तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली आहे. महा विकास आघाडी तर्फे ऍड. ललिता पाटील आणि संपदा पाटील हे दोन नावे समोर येत आहे, मात्र ललिता पाटील या स्मिता वाघ यांच्या पराभव करू शकतील असे वाटत नाही, त्यामुळे भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरुद्ध एक सक्षम महिला उमेदवार देण्याच्या उद्देशाने संपदा पाटील यांच्या नावाचा महाविकास आघाडी कडून विचार होऊ शकतो, कारण संपदा पाटील यांचे माहेर अमळनेर असल्याने कदाचित त्यांना तिथून लीड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच चाळीसगाव त्यांचे सासर आहे, त्यांचे पती उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार आहे, तसेच त्यांच्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम करणारे जिल्हाभरात असंख्य मतदार आहेत, तो एक फायदा त्यांना होऊ शकतो, संपदा पाटील जर महाविकास आघाडीच्या उमेदवार झाल्या तर शिवसेना (उबाठा) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत होईल, यात तीळमात्र शंका नाही, शिवाय भाजपच्या काही अदृष्य हातांची देखील त्यांना साथ मिळू शकते, हे देखील लपून राहणार नाही. त्याचप्रमाणे मुस्लिम, दलित, मराठा व ओबीसी यांचेही त्यांना सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना या मतदारसंघात संपदा पाटील याच जोरदार फाईट देऊन विजय खेचून आणू शकतात,
शिवाय मतदारसंघातील अनेक गावांनी ,शेतकरी बांधवांनी ,मतदार राजानी मीडियासमोर तीव्र प्रतिक्रिया नोंदवीत “आम्ही ठाकरे गटाला मतदान करणार असल्याचे सांगाल जणू एक प्रकारे भाजपला ओपन चालेंज केल आहे .अशीही जनता भाजपच्या खोट्या अश्वासंनानी ,महागाईने,फोडाफोडीच्या राजकारणाने पुरती बेहाल झाली आहे .थोडक्यात मतदार संघात भाजपविरोधी वातावरण तयार झाल्याने याचा फायदा नक्कीच सौ. संपदा उन्मेष पाटील आणि पर्यायाने महाविकास आघाडीला विशेषतः उ.बा.ठा.गटाला होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही .
जर उ.बा.ठा.गटाने सौ. संपदा उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली तर जळगाव लोकसभा मतदार संघाची लढत अतिरोमान्च्कारी ठरेल.व भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांची विजय वाट खडतर होण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेला जळगाव मतदार संघ हातातून निसटत असल्याने २०१९ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करत भाजप ऐनवेळी उमेदवार बदलणार का ? अश्या चित्र विचित्र चर्चांना जिल्ह्यात उधान आले आहे