चाळीसगाव (राजमुद्रा )- जीवनात आपण आपल्या स्वच्छेने विविध दान देतो. रक्तदानाप्रमाणेच देहदान हे वैद्यकीय अध्ययन व संशोधनासाठी जीवनदायी महादान ठरते. सर्व दानांपेक्षा मरणोत्तर देहदान हे सर्वश्रेष्ठ समजले जाते. देहदान हे बदलत्या काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन समाज प्रबोधनी बहुउद्देशीय संस्था चाळीसगावच्या वतीने देहदान आणि अवयवदान जन जागृती अभियान राबवला जात आहे. या अभियानात संस्थेचे अध्यक्ष प्रा. गौतम निकम यांनी स्वतः सहभागी होऊन २५ मार्च रोजी तशा फार्म भरला आहे. यानिमित्ताने देहदान आणि अवयवदानचा प्रचार आणि प्रसार केला जात असून यासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमजही दूर करण्यात येत असल्याचे प्रा. निकम यांनी सांगितले.
समाज प्रबोधनी बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव जि जळगाव च्या वतीने देहदान आणि अवयवदान जन जागृती अभियान राबवला जात आहे.या अभियानात स्वतः सहभागी होऊन दि.२५ मार्च २०२४ रोजी तशा फार्म भरला आहे.यानिमित्ताने देहदान आणि अवयवदानचा प्रचार आणि प्रसार केला जात असून यासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमजही दूर करण्यात येत आहेत.
देहदान, अवयवदानाला देशात शहरी , ग्रामीण भागातही देहदान आणि अवयवदान याविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे सहसा कोणी त्यासाठी तयार होत नाहीत.
मरावे परी अवयवरुपी उरावे
देहदान किंवा अवयवदान करण्याची इच्छा काही जणांना असली तरी, त्यासंदर्भातील प्रक्रियेसंदर्भात माहिती नसल्याने त्यांना अडचणी येतात. देहदान किंवा अवयवदान करण्याची इच्छा असलेल्या अनेकांना या प्रक्रियेसंदर्भात माहिती नसल्याचेही दिसून येते. मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपला अर्ज जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरणे आवश्यक असते. किंवा https://notto.abdm.gov.in/ या लिंकवर फार्म भरावे.
अवयवांचे प्रत्यारोपण ही आधुनिक विज्ञानाची मोठी देणगी आहे. शासनातर्फे यासाठी पुढाकार घेतला जात आहे. . भारतात अवयवदानाचा संकल्प करून प्रतिज्ञापत्रक भरण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या फक्त ०.०१ टक्के इतके आहे. प्रत्यक्ष अवयवदानाचे प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे. कुणाला अवयवदान व देहदानाचा संकल्प करायचा असेल तर त्यांनी
https://notto.abdm.gov.in/ या लिंकवर फार्म भरावे ही विनंती प्रा गौतम निकम अध्यक्ष,समाज प्रबोधनी बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव जि जळगाव यांनी केली आहे .