मुंबई (राजमुद्रा)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल.
जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या संघटनेसोबत आम्ही सहयोग करणार आहोत. त्यांनी ३० तारखेपर्यंत थांबा असं सांगितलं आहे, असं आंबेडकर म्हणाले. याशिवाय वंचितकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे वंचितने मविआसोबत संबंध तोडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेतला नाही. आम्ही जरांगे पाटील यांच्याशी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. येत्या काळात याबाबत निर्णय घेण्यात येईल. घराणेशाही सोडून गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाणार आहे. जैन उमेदवाराला तिकीट दिले जाईल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल, असं आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक होते. त्यांना चार जागांची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी वाट धरली आहे. याचे सूतोवाच त्यांनी काल कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामध्ये केले होते. वंचित स्वतंत्र लढणार आहे. शिवाय त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या संघटनेची मदत मिळण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकरांसोबतच्या आघाडीवर जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका; ”३० तारखेला भूमिका…” वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत काडीमोड करत स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरांनी वंचितचे उमेदवारही जाहीर केले आहेत. ”महाविकास आघाडीने जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेतला नाही. आम्ही जरांगे पाटील यांच्याशी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. येत्या काळात याबाबत निर्णय घेण्यात येईल. घराणेशाही सोडून गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाणार आहे. जैन उमेदवाराला तिकीट दिले जाईल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल” असं आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून वेगळी वाट धरली आहे. याचे सूतोवाच त्यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामध्ये केले होते. वंचित स्वतंत्र लढणार आहे. शिवाय त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या संघटनेची मदत मिळण्याची अपेक्षा आहे. वंचित आघाडीने भलेही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्यासोबत जाण्याबाबतच्या दाव्यावर मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. जरांगे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमची चर्चा झाली परंतु आम्ही वंचितला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही ३० मार्चपर्यंत राजकीय निर्णय जाहीर करणार आहोत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे बोलावलेल्या बैठकीमध्ये अपक्ष उमेदवार उभे करण्याचा तात्पुरता निर्णय घेतला होता. १७ ते १८ मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार उभा करत; त्या उमेदवारांमध्ये मराठा, मुस्लिम, दलित, धनगर समाजाचे उमेदवार असतील, असं स्पष्ट केलं होतं. याबाबचा निर्णय ३० मार्च रोजी होणार आहे. वंचितचे आठ उमेदवार जाहीर
भंडारा गोंदिया- संजय केवतड, चिरोली-चिमूर- हितेश मडावी, चंद्रपूर – राजेश बेल्ले, बुलढाणा- वसंत मगर, अकोला- प्रकाश आंबेडकर, अमरावती- कुमारी प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा- राजेंद्र साळुंके, यवतमाळ वाशिम- खेमसिंग पवार