जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जैन इरिगेशनचा आर्थिक वर्ष २०२१ चा आर्थिक निकाल जाहीर करण्यात आला असून जैन इरिगेशनच्या चौथ्या तिमाहीतील एकत्रित उत्पन्नात १९.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने काल घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी देऊन जाहीर केले.
चौथ्या तिमाहीतील जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात १९.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली असून २०२१ या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पन्न ५६६६.९ कोटी रूपयांवर पोहोचले आहे. सोबतच एकल उत्पन्न २१५६.४ कोटी रूपये नोंदवले गेले आहे.
एकत्रित कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन, चौथ्या तिमाहीत १ टक्क्यांवरून ११ टक्के इतका वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२१ चा ५ टक्क्यांपासून ८ टक्क्यांपर्यंत वाढला. २०२१ चा एकत्रित करव्याज घसारापूर्व नफा ४६८ कोटी नोंदवला गेला आणि एकल करव्याजघ सारापूर्व नफा १५६.२ कोटी रूपयांवर पोहेचला. चौथ्या तिमाहीतील एकत्रित करपश्चात नफा ६३ ९ कोटी रूपये झाला आणि एकल करपश्चात तोटा २२.२ कोटी रूपये होता. आर्थिक वर्ष २०२१ चा एकत्रित करपश्चात तोटा ३६८.७ कोटीवर पोहेचला आणि एकल करपश्चात तोटा ३०७.३२ कोटी रूपये झाला. जागतिक मागणी पुस्तकात ४१९० कोटी रूपयांच्या ऑर्डर्स आहेत.