जळगाव(राजमुद्रा):- मार्च महिन्यातच जळगावसह राज्यातील काही भागात तापमानाचा प्रकोप पाहायला मिळतोय. जळगावात तापमानाने 42 चा टप्पा ओलांडला आहे. या यामुळे वाढत्या उन्हामुळे जीवाची लाही लाही झाली आहे.
मात्र उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयएमडी मुंबई विभागाने उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाची इशारा दिला आहे. पावसाबाबतचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज सकाळपासून उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र ढगाळ वातावरण असताना देखील उकाडा जाणवत आहे. दरम्यान, नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
येत्या ३ ते ४ तासात घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन आयएमडी मुंबई विभागाने केले आहे.