चाळीसगाव (राजमुद्रा):- जळगाव जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे इसमांविरुध्द मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करुन ते खरोखर जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशांत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात येत आहे.
चाळीसगांव शहर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०२/२०२३ प्रमाणे सामनेवाले (१) जगदीश जगन्नाथ महाजन वय ५१ रा. नेताजी पालकर चौक चाळीसगांव टोळी प्रमुख, (२) दादु उर्फ विशाल जगदीश महाजन वय २३ रा. नेताजी पालकर चौक चाळीसगांव टोळी सदस्य, यांच्याविरुध्द जळगांव जिल्हयातील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन ला खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरी हल्ला, घातक हत्यार बाळगणे गुंगीकारक अंमली पदार्थ, दंगल करणे असे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी श्री उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग चाळीसगांव यांनी केलेली आहे.
सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हददीत परीसरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण इ आलेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोहेकॉ/विनोद भोई, पोना/ तुकाराम चव्हाण, पोना महेद्र पाटील, अशांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
मा. श्री. डॉ महेश्वर रेडडी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती सामनेवाले यांना ०६ महिने करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो.निरी. श्री. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.