जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जळगाव पासून जवळ असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मध्ये दररोज केवळ १००० पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी ९ ते ४ पर्यटकांसाठी लेणी खुली राहणार आहे. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहे. दरम्यान यापूर्वी अजिंठा लेण्यांमध्ये दररोज २००० पर्यटकांना प्रवेश दिला जात होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत परवानगी दिली आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात ५०० व दुपारच्या सत्रात ५०० या प्रमाणे पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी ३ वाजता तिकीट बुकिंग बंद करून पर्यटकांना प्रवेश बंदी केली जाईल. तसेच ४ वाजता सर्व पर्यटकांना बाहेर काढून लेणी बंद केली जाणार आहे.
अजिंठा लेणीचे निसर्ग सौंदर्य बहरले असून तिला पाहण्यासाठी जिल्ह्यातून हजारो पर्यटक येत असतात परंतु कोरोना काळात शासनाने निर्बंध लावल्याने पर्यटकांवर याचा फरक पडला आहे.