जळगाव (राजमुद्रा) : – जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार यांना देण्यात आलेली उमेदवारी आता सत्ताधारी भाजपाला डोकेदुखी ठरली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याविरोधात विरोधी पक्षाला तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने आता भाजप कोंडीत सापडला आहे. त्यामुळे पुन्हा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्याकरिता संकटमोचक गिरीश महाजन हे सक्रिय झाल्याची माहीती मिळाली आहे. भाजपाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपामध्ये नाराजीसत्र सुरु झाले. गेल्या पंचवार्षिकमध्ये लोकप्रिय व कामात कुशल असलेले खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट पक्षश्रेष्ठींनी कापले हे कार्यकर्त्याना आवडले नाही. त्यामुळे कुठेतरी उन्मेष पाटील यांनाहि अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. अखेर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. तसेच पारोळा येथील युवा करण पवार यांचेसह उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. त्याचवेळी उन्मेष पाटील यांना पुन्हा ठाकरे गटाकडून तिकीट देण्याची तयारी सुरु झाली. मात्र उन्मेष पाटील यांनी मास्टर स्ट्रोक खेळत मैत्री भावना जपून करण पवार यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले. उन्मेष पाटील यांच्या या खेळीमुळे भाजप अडचणीत आली आहे. कारण स्मिता वाघ यांच्याविरुद्ध तुल्यबळ उमेदवार शिवसेना ठाकरे गटाला मिळणार नाही या भ्रमात असणारीभाजपाची खेळी आता उलटली आहे. करण पवार हे तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने ठाकरे गटात चैतन्य निर्माण झाले आहे. तसेच, करण पवार, उन्मेष पाटील यांचेसह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाची लोकसभा जागा हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीत भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे आता कामाला लागले आहे. पुनः एकदा उमेदवारी बदलण्याच्या हालचालींना वेग आला असून माजी खा.ए. टी. नाना पाटील,व चाळीसगाव चे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींच्या चर्चा सुरु झालेल्या असुन भाजपाचे संकट मोचक व मा.खा.ए.टी.नाना पाटील यांच्यात बंद दाराआड गुप्त भेटीत चर्चा झाल्याचेही कळते आहे आता भाजपात सर्व काही संकटमोचक यांच्या भूमिकांवरच पुढील हालचाली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.