चाळीसगाव ( राजमुद्रा ) : – दिनांक 03/04/2024 रोजी सकाळी वरखेड बु. येथील पोलीस पाटील यांनी सपोनि श्री संदिप परदेशी यांना त्यांचे मोबाईल व्दारे संपर्क करुन कळविले की, वरखेडे बु. गावासमोर गिरणा नदी पात्रातील रेतीत एक प्रेत स्त्री जातीचे अर्धवट स्थितीत रेतीमध्ये पुरलेले दिसत आहे त्या ठिकाणी जावून खात्री केली असे कळविल्याने आम्ही लागलीच सरकारी वाहनासह पोलीस स्टॉफ सह सदर माहीती मिळालेल्या • ठिकाणी जावून खात्री केली असता सदर ठिकाणी वरखेडे गावातील व आजुबाजुचे परीसरातील अंदाजे 200 ते 300 लोक हजर होते पोलीस पाटील व आम्ही पोलीस स्टॉफ अशांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन घडलेल्या प्रकारा बाबत वरिष्ठ अधिकारी तसेच तहसिदार साहेब, वैदयकीय अधिकारी यांना घडलेला प्रकार कळवुन जळगाव येथील फॉरेन्सीक पथक तसेच गुन्हे शोध पथक, जळगाव, डॉग स्कॉड, जळगाव यांना घटनास्थळी पाचारन केले फॉरेन्सीक पथक व डॉग स्कॉडच्या मदतीने गुन्हयांस उपयुक्त पुरावे तात्काळ शासकीय पंचा समक्ष जप्त केले तसेच मा. तहसिलदार सो चाळीसगाव यांचे प्रतिनिधी समोर फॉरेन्सीक टिम पथकाच्या मदतीने मयत महीलेचे प्रेत वर काढले असता हजर असलेल्या नागरीकांनी व महीलेच्या वारसांनी सदर मयत महिला हिस ओळखले तीचे नाव मायाबाई सजन मोरे वय 35 रा. वरखेडे खु. ता. चाळीसगाव असे असल्याचे निष्पन्न झाले तीस डोक्यावर दोन्ही कानाजवळ डोळयाजवळ, छातीवर, मांडीवर चाकू सारख्या हत्याराने व दगडाने जखमा केलेल्या दिसुन आल्या व तीस जिवे ठार मारून गिरणा नदी पात्राचे वाळु ढिगा-यात अर्धवट बुझुन पुरावा नष्ट करण्याचा अटक आरोपीने प्रयत्न केलेला आहे. नमुद गुन्हयांचे तपास कामात वरखेडे खु. शिवारातील ज्ञानेश्वर शांताराम निरमली यांचे मक्याचे शेतात मिळालेल्या पुराव्या वरुन सदर मयत महिलेवर त्या ठिकाणी बलात्कार झ आलेला आहे बाबत प्रथम दर्शनी निदर्शनास आले.
वरील अपराधाच्या घटने बाबत आम्ही मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी सो जळगाव ADD SP श्रीमती कविता नेरकर, सहा. पोलीस अधिक्षक श्री अभयसिंह देशमुख सो यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे तपासाचे चक्र जलद गतीने फिरवुन गुन्हयातील संशयीत आरोपी याची गुप्त माहीती गोळा करुन वर नमुद गुन्हयांतील आरोपी यास गुंन्हाची माहीती मिळाल्या पासुन तीन तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन त्याला पोलीस खाकी दाखविल्यावर सदर घटनेचा त्याने उलगडा केला आरोपी संतोष धोंडु भिल रा. पिंपळवाड म्हाळसा ता. चाळीसगाव व मयत महिला एकाच समाजाचे असुन वरखेडे गावा पासुन तीन किलोमिटर अंतरावर आरोपी राहणारा असुन त्यांच्यात प्रेम संबंध संमतीने होते त्यातुन मध्यरात्री आरोपी हा मयत महीलेस भेटण्यास गेला त्यांची मक्याच्या शेतात भेट झ याने मयत गाली त्या नंतर त्यांच्यात आपसात शाब्दीक वाद होवुन त्या रागाच्या भरात आरोपी महीले सोबत अतिप्रसंग करुन धारदार शस्त्राने हल्ला करुन जिवे ठार मारुन शेता शेजारी असलेल्या गिरणा नदीचे पात्रातील वाळुत अर्धवट मयत महिलेच प्रेत बुझले सदर मयत महीलेच्या प्रेतावर ग्रामीन रुग्नालय, चाळीसगाव येथे पोस्ट मार्टन करण्यात आले असुन आरोपी यास गुन्हयां कामी अटक करण्यात आले आहे. गुन्हयांचे तपास कामी व आरोपी अटक करणे कामी सपोनि श्री संदिप परदेशी सो, पोउपनिरी श्री विकास शिरोळे, पोउपनिरी श्री रमेश घडवजे, पोउपनिरी श्री गोपाल पाटील, सफौ/मिलींद शिंदे, पोहेकॉ नितीन सोनवणे, पोना/दिपक नरवाडे, पोना/प्रकाश कोळी, पोकों/गोरख चकोर, पोकॉ/भुषण पाटील, पोकॉ/सुदर्शन घुले, पोकॉ/हनुमंत वाघेरे, पोकॉ/जितुसिंग परदेशी, पोकॉ/निलेश लोहार अशांनी गुन्हा उघडकिस आणण्यास मदत केली आहे वरील गुन्हयांत फिर्यादी- सर्जेराव विक्रम मोरे वय 50 रा. वरखेडे खु. (मयताचे जेठ) यांनी तक्रार दिल्याने भाग 5 गुरन 82/2024 भादवि क.302, 376, 324,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.