जळगाव (राजमुद्रा) : – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मतदारसंघाचे माजी खासदार उमेश दादा पाटील यांनी धक्का तंत्राचा अवलंब करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगले ढवळुन निघाले असून राजकीय हालचालींना वेग आलेला दिसत आहे त्यामुळेच की काय? आज अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेजी अचानक जळगाव शहरात दाखल झाले आहेत .
शहराच्या एमआयडीसी भागात असलेल्या हॉटेल फोरसिझन मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व भारतीय जनता पार्टीचे संकट मोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यात बंद दारावर चर्चा सुरू आहे.
जळगाव लोकसभेमध्ये शिंदे गटातील पाचोरा – भडगाव तसेच जळगाव ग्रामीण हे दोन विधानसभा मतदार संघात शिंदे गटाचे आमदार आहेत. या भागातून मोठा मतदानाचा आकडा महायुतीच्या पारड्यात पाडण्यासाठी व महायुतीतल्या शिंदे गटाच्या आमदारांसोबत योग्य समन्वय करण्यासाठी एकनाथ शिंदे हे अचानक मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून जळगाव येथील फोर सीजन हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.
विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कट करून भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी मित्र करण पवार यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केल्याने जळगाव लोकसभेचे गणित भाजपच्या बाजूने बिघडली आहेत विद्यमान खासदार असताना मित्र असलेल्या करण पवार यांना लोकसभेचे उमेदवारी मिळवून देण्यात व उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला यामुळे जळगाव लोकसभेची निवडणूक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस होणार हे निश्चित आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ यांना निवडून आणावे यासाठी मंत्री गिरीश महाजन सक्रिय झाले आहेत.
शिंदे गटातील आमदार शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला कुठल्याही फटका नको म्हणून याबाबत मंत्र गिरीश महाजन विशेष काळजी घेत आहे.