मुंबई (राजमुद्रा) : – काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. मुंबईतील बडे राजकीय व्यक्तीमत्व मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केला. मग बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. आता काँग्रेसला आणखी झटका बसला आहे. आता पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसवर घणाघाती हल्ला त्यांनी केला.