छत्रपती संभाजीनगर, (राजमुद्रा ) : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयीत आरोपींच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या बातमीनं खळबळ उडाली आहे. एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरातील त्या तीन तरुणांची चौकशी करण्यात आली आहे. बंगळुरू स्फोटातील दोन मुख्य आरोपींसोबत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून हे तरुण संपर्कात असल्याचा संशय एनआयएला आहे.
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयितांच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात एनआयए व दिल्ली पोलिसांच्या पथकाने हर्सूल परिसरातील तीन तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप, मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले
आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ते संशयितांच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. जवळपास ८ तासाच्या चौकशीनंतर या तरुणांना नोटीस बजावून पथक रवाना झाले. १ मार्च रोजी बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट होऊन ११ जण गंभीर जखमी झाले होते. आयडी टायमर वापरून हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता.
काय आहे नेमकी घटना?
एक मार्च रोजी बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवण्यात आला होता. या बॉम्बस्फोटासाठी आयडी टायमरचा वापर करण्यात आला होता. या शक्तिशाली बॉम्बस्फोटामध्ये 11 जण गंभीर जखमी झाले होते. आता या प्रकरणात एनआयएकडून तपास सुरू आहे. तपास सुरू असतानाच या बॉम्बस्फोटचं छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आलं आहे.