जळगाव,(राजमुद्रा)- जळगाव लोकसभा निवडणुकीत फॉर्म भरण्याच्या आधीच जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्याची माहिती मिळत असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर त्यांनी शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केल्याचे पत्रकार परिषदेत सांगत गंभीर आरोप केले होते, वंचितच्या माध्यमातून जळगाव लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रफुल्ल लोढा यांनी सांगितलं होतं मात्र त्यांनी उमेदवारी करणार नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती मिळत आहे.
‘या’ कारणास्तव प्रफुल्ल लोढा लढणार नाहीत
जळगाव लोकसभा मतदार संघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नसल्याचे कारण देत प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं समजतं याबाबत उमेदवारी मागे घेत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणे झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभ राहायचं कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार असून कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कुणाच्या दबावाला मरेपर्यंत मी घाबरणारा नाही स्वतःच्या मनाने उमेदवारी घेतली आणि स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेत असल्याचं प्रफुल लोढा यांनी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.