जळगाव(राजमुद्रा) : – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्याचा प्रारंभ जळगाव शहरात गुरुवार (दि.१८) रोजी पासून झाला आहे. जिल्ह्यात प्रत्येक पक्ष व त्या पक्षाचा कार्यकर्ता हा या कामी कामाला लागला असून दरम्यान गेल्या पंधरा महिन्यात अवकाळी पाऊस, शेतीपिकाला भाव नाही, गारपीटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील तब्बल १८४ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास थांबल्याचे एका अहवालातून समोर आहे आहे.
यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी ११२ प्रकरणे पात्र ठरले आहेत. तर ६९ प्रकरणे हे अपात्र ठरली असून मार्च महिन्याचे बारा प्रकरणे अजूनही प्रलंबितच आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत प्रचारामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतीमालाला भाव नाही, शेतीमाल पिक विमा अशा व अनेक इतर घोषणा करण्यात आल्या मात्र पात्र लाभार्थींपर्यंत पोहचल्या नाहीत. तर गेल्या पंधरा महिन्यात जळगाव जिल्ह्यात आलेला अवकाळी पाऊस, शेती उत्पादनात झालेली घट, शेतीमालाला मिळत नसलेला भाव, कर्जबाजारीपणा, डार्क झोन, गारपीट अवकाळी पाऊस अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांनी जीवनप्रवास थांबवला आहे.
जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या 455 दिवसात दोन किंवा तीन दिवसाआड जिल्हयात एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे. असे १५ महिन्याच्या कालावधीत (४५५ दिवसात ) १८४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २०२३ व २०२४ या वर्षात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये ११२ शेतकऱ्यांना मदत मिळण्यास पात्र ठरले आहेत. तर ६९ प्रकरणे ही अपात्र ठरली आहेत. मार्च २०२४ महिन्यात झालेल्या जीवनप्रवास थांबवल्याच्या प्रकरणांपैकी एकही प्रकरण मंजूर किंवा पात्र ठरलेले नाही ते सर्व प्रकरणे प्रलंबितच आहे.
जळगाव जिल्हा हा कापूस यासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी व या वर्षातील तीन महिन्यांमध्ये दर महिन्याला दोन आकडी किंवा एक आकडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची आकडेवारी समोर आलेली आहेत. २०२३ या वर्षी सर्वात कमी जीवन संपवल्याच्या घटना उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात झालेले आहेत. तर २०२४ चा विचार केल्यास मार्च महिन्यात ९ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास थांबवला आहे.
२०२३ मध्ये शेतकऱ्याच्या झालेल्या आत्महत्या
महिने एकुण पात्र अपात्र
जानेवारी 22 19 3
फेब्रुवारी 13 5 8
मार्च 14. 10 4
एप्रिल 9 9 –
मे 6 6 –
जून 17 13 4
जुलै 12 3 9
ऑगस्ट 11 6 5
सप्टेंबर 17 10 7
ऑक्टोबर 10 7 3
नोव्हेंबर 9 7 2
डिसेंबर 11 5 6
एकूण 151 100 51
2024 मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या
महिने एकुण पात्र अपात्र प्रलबित
जानेवारी 12 7 3 2
फेब्रुवारी 12 5 6 1
मार्च 9 0 0 9
एकूण 33 12 9 12