भुसावळ (राजमुद्रा). : – दोन ट्रकांमधून बेकायदेशीर गाईंना कोंबून त्यांची वाहतूक करणारे वाहन भुसावळ शहरातील यावल नाक्याजवळ २९ रोजी दुपारी अडविण्यात येऊन २५ गाईंची सुटका करण्यात आली. कोंब्यामुळे दोन गाय आणि एका वासराचा मृत्यू झाला .
याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.
पंजाब राज्यातून गायींची अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने दोन ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गो प्रेमींनी भुसावळ शहरातील यावल नाक्यावर सोमवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता दोन ट्रक गो प्रेमींच्या उपस्थितीत अडवण्यात आल्या. भुसावळ शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन ट्रकची पाहणी केली असता अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेने गायींची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. ट्रकमध्ये गुरांसाठी कुठलीही चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याने दोन्ही ट्रक अकलूद येथील आसाराम बापूजी आश्रमात नेण्यात आल्या. यावेळी गुरांची चारा-पाण्याची तसेच उपचाराची व्यवस्था करण्यात आली.
संशयीतांनी गायी पालनासाठी नेत असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्ष पाहणीत गुरांची चारा-पाण्याची व्यवस्था दिसून आली नाही तसेच अत्यंत दाटी-वाटीने व क्रुरतेने त्यांची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. क्रुरतेने गुरांची वाहतूक केल्यानंतर दोन गायींसह एका वासराचा गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.