पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । जरंडेश्वर साखर कारखाण्यावर कारवाई ही तर सुरुवात आहे. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सूत गिरण्यांची चौकशी तपासयंत्रणांच्या रडारवर असल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाले की, राज्यसहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून ते जप्त करायचे नंतर त्यांचा लिलाव करायचा आणि दोनशे कोटीची संपत्ती पंधराशे कोटीत खरेदी करायची त्यावर पुन्हा तीनशे कोटीचे कर्ज घ्यायचे. अश्या पद्धतीला गैरव्यवहार राज्यात झाला आहे. अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्या नंतर त्यांच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहे. यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहे. असे त्यांनी सांगितले. सहकारी साखर कारखान्यांची शेकडो कोटींची संपत्ती कवडीमोलाने हडपण्याच्या प्रकारची चौकशी होण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दाद मागणार आहोत. राजकीय दबावाला कारवाई केल्याचा आरोप त्यांनी नाकारला.