नंदुरबार (राजमुद्रा : –आदिवासीबहुल नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व ॲड. के. सी. पाडवी या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
लोकसभा २०२४ निवडणुकांचा आज निकाल आहे. नंदुरबारमधील निकालाची प्रत्येक अपडेट वाचा फक्त महाराष्ट्र टाइम्सवर. नंदुरबारमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा लोकसभेत सामना रंगला आहे. पण यंदा वंचित बहुजन आघाडीने सुद्धा काँग्रेस आणि भाजपाची डोकेदुखी वाढवली आहे. भाजप पुन्हा गड राखण्यासाठी पुर्ण ताकदीनिशी मैदानात आहे तर काँग्रेस नंदुरबार मतदारसंघ मिळवण्यासाठी धडपडीत आहे.
काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना १९ हजार ३९० मतांची आघाडी
काँग्रेसचे गोवाल पाडवी १ लाख ५ हजार मतांनी पुढे आहेत
आदिवासीबहुल नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित व ॲड. के. सी. पाडवी या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला सर करुन सलग दोनदा विजयी झालेल्या भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यापुढे यंदा काँग्रेसचे नवखे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. नंदुरबार हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने याच मतदारसंघातून प्रचाराचे रणशिंग फुंकलेले आहे. इंदिरा गांधींना ‘माय’ म्हणणारा हा मतदारसंघ दहा वर्षांपूर्वी मात्र भाजपच्या ताब्यात गेला.