नवी दिल्ली (राजमुद्रा)
नवीन स्थापन झालेल्या (नरेंद्र मोदी) केंद्र सरकारने पहिल्या (दि.10) रोजीच्या कॅबिनेट बैठकीत सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय घेतला आहे.
नवीन स्थापन झालेल्या केंद्र सरकारची पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पीएम आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने सन 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे, या योजनेचा उद्देश हा ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र कुटुंबांना पायाभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा आहे.
PMAY अंतर्गत गृहनिर्माण योजनांतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण 4.21 कोटी घरे पूर्ण झाली आहेत.
PMAY अंतर्गत बांधलेल्या सर्व घरांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या इतर योजनांच्या संयोजनात घरगुती शौचालय, LPG कनेक्शन, वीज कनेक्शन, घरगुती नळ कनेक्शन इत्यादी इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे.
पात्र कुटुंबांच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत दिली जाईल, असा निर्णय (दि 10 जून) रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारतच पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला असून, देशतील 9 हजार 300 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जमा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे