जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील गिरणा नदी पात्रात अंघोळीला गेलेल्या शुभम उर्फ भवरलाल हिरालाल पाटील (वय २६) रा. हिराशिवा कॉलनी, खोटे नगर या तरुणाचा पाय घसरून नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहिती नुसार, खोटे नगर परिसरातील हिराशिवा कॉलनी येथील २६ वर्षीय शुभम उर्फ भवरलाल हा तरुण ११:३० च्या सुमारास गिरणी नदी पात्रात अंघोळीला गेला असतांना त्याचा पाय घसरून नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश करून शोक व्यक्त केला.