पाचोरा राजमुद्रा | पाचोरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल बेहरे नरेंद्र नरवाडे कमलेश राजपूत यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सन्मान करून गौरविले आहे. पाचोरा तालुक्यातील विविध गुन्ह्यांमध्ये उत्कृष्टरित्या प्रकरण हाताळली तसेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे विशेष कार्य केल्याने पोलीस अधीक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाचोरा पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे.
सन्मान झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सामान्यांना मदत करून बाकीचे माणुसकीचे दर्शन घडवले आहे. गंभीर होण्याची उकल करून त्यामधील खरेखुरे गुन्हेगार उघडकीस आणून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचे विश्वास सार्थ अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.
माणुसकीचा दिला हात
पोलिस कर्मचारी राहुल बेहरे यांनी आपले दोन सहकारी श्री नरेंद्र नरवाडे, कमलेश राजपूत यांना सोबत घेऊन त्या व्यक्तीला चोपडा येथील मानव सेवा या संस्थेत स्वतः जाऊन सोपविले त्यांच्या या चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान केला.
त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे साहेब, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब या सर्वांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी राहुल बेहरे, नरेंद्र नरवाडे, कमलेश राजपूत यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.