राजमुद्रा | राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ठिकठिकाणी पावसामुळे आनंदाचा वातावरण निर्माण झाले यामुळे शेतकरी सुखावला आहे. हंगामाच्या योग्य वेळेत बऱ्याच भागात राज्यभरात पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात उखाड्याचे वातावरण होते. पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे मात्र बऱ्याच ठिकाणी जन जीवन विस्कळीत झाल्याचा बघायला मिळाले आहे अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या चुकांमुळे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई न झाल्याकारणाने पाणी साचायला सुरुवात झाली आहे यामध्ये प्रशासनाच्याच वतीने मार्ग काढणं सध्या सुरू आहे तसेच उपाययोजना केल्या जात आहे. धक्कादायक म्हणजे नागपुरात एका भागामध्ये पाणी साचल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांनी बेदम मारहाण केली आहे
नागपुरात पाऊस पडल्यामुळे एका परिसरामध्ये पावसाचे पाणी घरात शिरलं होतं त्यामुळे समस्या ग्रस्त झालेल्या नागरिकांनी टोकाचा पाऊल उचलत थेट नगरसेवकाला मारहाण केली आहे यादरम्यान कायदेशीर मार्ग अवलंबून अपेक्षित असताना थेट माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आल्याने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे दीपक चौधरी असे भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. जुना सुभेदार भागात रस्त्याच्या विकास कार्याचं काम सुरू असताना पावसाचे पाणी घरात शिरलं यामुळे हा प्रकार घडला आहे. परिसरात पाणीच असल्याने नागपुरातील काही नागरिकांनी भाजपाच्या माजी नगरसेवकांना बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे.