64 हजार कोटीचे बिल थकली ; शासकीय कंत्राटदार संघटनेन दिला काम बंदचा इशारा
जळगाव राजमुद्रा | राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदार केलेल्या कामांची २० हजार कोटी रुपयांची देयके गेल्या सहा महिन्यांपासून शासन स्तरावर अडकली असून ही बिले अदा करण्यात शासन स्तरावरून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे, असा आरोप शासकीय कंत्राटदार संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांनी केला असून महाराष्ट्र शासनाला इशारा पत्र देण्यात आले आहे. याविरोधात २७ जूनपासून कामबंद चा इशारा जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी दिला आहे.
अनेक विकास कामांच्या निविदा झालेले आहेत मात्र निविदा होत असताना या कामांचा आर्थिक पुरवठा मात्र शासनाकडून थांबवण्यात आला आहे. कामांची निविदा होऊन कामे अर्ध्यावर आले असताना देखील शासनाकडून अद्याप पर्यंत निधीबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही वेळोवेळी यासाठी निधीची पूर्तता व्हावी म्हणून पत्रव्यवहार करण्यात आला मात्र तरी देखील शासनाकडून कुठलीही दखल देण्यात आलेली नाही यामुळे शासकीय कंत्राटदार संघटनेने इशारा पत्र शासनाला बजावले आहे.
शासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे कंत्राटदारांच्या कुटुंबाची मोठी आर्थिक परवड होत आहे. राज्यातील सार्वजनिक
बांधकाम फक्त विभागाने यावर्षी बजेटमध्ये १८ हजार कोटींची तरतूद असतांना कोटींचा जवळपास ६४ हजार कामांना १७ मार्चपर्यंत मंजुरी देऊन त्यांच्या निविदासुद्धा पूर्ण कामामध्ये जिल्हा, राज्य व ग्रामीण मार्ग यांची दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे तसेच रस्त्यातील खड़े भरणे तसेच राज्यातील प्रमुखा शहरे व तालुका तसेच ग्रामीण भागामधील इमारती दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती या सर्व केल्या आहेत.
सहा महिन्यापासून अडकली बिले
शासनाने मंजूर केलेल्या शासन स्तरावर देयके अडकून आजमितीस जवळपास ६ महिने झाले. सार्वजनिक बांधकाम व अर्थ खाते यांच्यातील बेबनाव व चुकीची कार्यपद्धती यामुळे कंत्राटदार यांची मात्र घालमेल होत आहे. कंत्राटदार यांनी आपला सगळा पैसा गुंतवून शासनाची विकासाची कामे केली. परंतु त्यांच्या केलेल्या कामांचा हक्काच्या पैसा मिळतच नाही. बँकेतील त्यांचा खात्यावरील सर्व रक्कम कामे करण्यासाठी खर्च केल्याने त्या खात्याचे व्याज भरायला सुद्धा आता कंत्राटदारांच्या अडचणी आहेत. यामुळे कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे सर्व घटक, त्यांचे कुटुंब यांची उपासमार होत आहे.
जिल्हाध्यक्षांचा इशारा..
शासनाची ही उदासीनता कंत्राटदार व सर्व घटक सहन करू शकत नाही. त्यामुळे कंत्राटदार यांची देयके देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम व अर्थ खाते यांनी निर्णय न घेतल्यास जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना ग्रामीण, तालुका आणि जिल्हास्तरावर मोठे आंदोलन करेल असा इशारा शासकीय कंत्राटदार संघटना जिल्हा अध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिला आहे. तसेच कंत्राटदारांची बिले देण्यात यावी यासाठी २० जून रोजी जळगाव जिल्हा कार्यकारी अभियंता पी. पी सोनवणे यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच २७ जून पासून काम बंद आंदोलन व उपोषणाही करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांनी दिला आहे.