मुंबई राजमुद्रा | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली पोलीस भरतीची प्रक्रिया अखेर पूर्णत्वास यायला सुरुवात झाली आहे. शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेचे ठिकठिकाणी विविध चाचण्यांसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी केली जात आहे यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यामध्ये आज पासून पोलीस भरतीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी मैदानी चाचणी तसेच गोळा फेक अशा विविध चाचण्या घेतल्या जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील युवक युतीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे राज्यात रत्नागिरी नाशिक पुणे छत्रपती संभाजी नगर अमरावती चंद्रपूर सह इतर ठिकाणी पोलीस भरती प्रक्रियेत निवड होण्यासाठी युवकांनी आपली शक्ती पणाला लावली आहे.
कोणत्या स्थितीमध्ये मैदान मारायचंच हा ध्यास घेऊन महाराष्ट्रातला तरुण आपलं गाव सोडून भविष्य निघाला आहे वर्षानुवर्ष केलेली मेहनत पडायला येईल या असेना तरुणांची पोलीस भरतीसाठी होणारी गर्दी परीक्षा केंद्रांवर लक्षवेधी ठरत आहे. या निमित्ताने मुख्यतः कारण महाराष्ट्रातील बेरोजगारीचा संकट देखील मोठे आहे यामुळे जागा जरी राज्यभरात भरतीच्या कमी असल्या तरी देखील प्रयत्न करून पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील युवा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
एवढ्या पदांसाठी भरती
राज्यभरात क्षमतेप्रमाणे शासनाने मागणीनुसार भरती प्रक्रिया राबवली आहे विविध जिल्ह्यातील एकूण 17 हजार 471 पदांसाठी महाराष्ट्रातील तरुण व तरुणी आपलं नशीब पोलीस भरतीमध्ये आजमावत आहे. विशेष म्हणजे 2024 च्या होणाऱ्या भरतीमध्ये 17471 पदांसाठी 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहे यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच सावट आहे हे देखील या भरतीच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. मोठ्या कालावधीनंतर शासनाच्या माध्यमातून निघालेली पोलीस भरती महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी आशेचा किरण ठरली आहे.
या जागांसाठी भरती
17000471 जागांसाठी 76 हजार 256 अर्ज दाखल झाले असताना यामध्ये बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाच्या जागा चालक पदाच्या 1686 जागा पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4349 जागांसाठी राज्यातील युवकांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
राज्यभरात पावसाचे थैमान
रत्नागिरी सह बऱ्याच भागांमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे या पावसाचे दिवस असल्याकारणाने ठिकठिकाणी दमदार हजेरी पावसाची लागले आहे वरती पाऊस सुरू असताना खाली महाराष्ट्रातला जिगरबाज करून मैदानी चाचण्या देत आहे. संपूर्ण चिखलमय झालेल्या ग्राउंड मध्ये कोणते स्थितीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ग्राउंड मारण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी प्रचंड मेहनत घेतली आहे.